एसटीच्या विलिनीकरणासाठी सरकारचे हात बांधलेत का? पटोलेंनी सरकारला घेरलं

एसटीच्या विलिनीकरणासाठी सरकारचे हात बांधलेत का? पटोलेंनी सरकारला घेरलं

मुंबई : एसटीच्या विलीनकरणासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हात कोणी बांधले आहेत काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येत्या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार असल्याचंही पटोल यांनी सांगितलं आहे.

पटोले पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार कर्मचाऱ्यांचे पगार करु शकत नाही, त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब असून आम्ही अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लावून धरणार आहोत, मात्र कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहनही पटोले यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर पाठवलं…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महागाई भत्ता वाढवला, घरभाडे, पगारही वाढवले. त्यावेळी अनेक नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. आता ही सगळी मंडळी गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar : ‘स्वतःच्या मिरवणुका काढून घेणारे चॉकलेट हिरो गायब झालेत’

राज्य सरकारकडे महामंडळाची एक हजार कोटी रुपयांची थकीत बाकी आहे, ती द्यावी अशी महामंडळ मागणी करत असताना राज्य सरकार मात्र पुरेसा निधी देत नाही. एसटी महामंडळाचे पगार करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडे पैसे नाहीत परंतु जाहिरातबाजीसह इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी मात्र या सरकारकडे पैसे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्याचं प्रश्न गंभीर असून आम्ही भाजपसारखं यामध्ये राजकारण करणार नाही. येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प नसणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube