भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचे राष्ट्रीय मिशन – अरविंद मेहता
Arvind Mehta : जागतिक स्तरावर १,३०० अब्ज डॉलर्सच्या प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच

Arvind Mehta : जागतिक स्तरावर १,३०० अब्ज डॉलर्सच्या प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ०.९६% इतका आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयाने प्रेरित होऊन भारताने पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा फक्त व्यापार विस्तार नसून भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे ,असे प्रतिपादन ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) चे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन अरविंद मेहता यांनी पत्रकार परिषदेत केले. या परिषदेला अध्यक्ष मनोज शाह,उपाध्यक्ष बिपीन देसाई, सुनील शाह, आदी उपस्थित होते.
ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) तर्फे २४ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल ललित, मुंबई येथे “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बूस्ट इंडियाज एक्सपोर्ट ऑफ प्लॅस्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स – अ ग्लोबल सोर्सिंग हब” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जागतिक स्तरावर १,३०० अब्ज डॉलर्सच्या प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ०.९६% इतका आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयाने प्रेरित होऊन भारताने पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा फक्त व्यापार विस्तार नसून भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे असे श्री. मेहता यांनी ठामपणे सांगितले.
AIPMA चे अध्यक्ष मनोज आर. शाह यांनी म्हटले की ही रणनीती MSME क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरेल. सध्या भारतात ५०,००० हून अधिक MSMEs कार्यरत असून ४.६ दशलक्ष रोजगारनिर्मिती झाली आहे. निर्यात लक्ष्य साध्य झाल्यास रोजगार संधी ६ दशलक्षांपर्यंत वाढू शकतात. AIPMA च्या Export Cell ने २१ देश व ९ HSN कोड्सचा अभ्यास केला असून भारताकडे गुणवत्ता व किमतीतील स्पर्धात्मकतेमुळे चीन (२२% हिस्सा) व व्हिएतनाम (४% हिस्सा) यांच्याशी स्पर्धा करून त्यांची जागा घेण्याची क्षमता असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या अमेरिकेतील ७२.३५ अब्ज डॉलर्स आयातीमध्ये भारताचा वाटा केवळ १.२% आहे.
या उद्दिष्टासाठी AIPMA ने तीन आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या असून, दिल्ली (१७ जुलै) व अहमदाबाद (२२ ऑगस्ट) नंतर तिसरी परिषद मुंबईत २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदांमध्ये निर्यातदार, धोरणकर्ते, जागतिक खरेदीदार व व्यापारतज्ज्ञ यांचा सहभाग राहील. याशिवाय मार्च २०२६ मध्ये मुंबईत “PlastiWorld 2026 Exhibition” चे आयोजन होणार आहे. ही भारताची पहिली जागतिक प्रदर्शनी असेल जी केवळ प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्ससाठी समर्पित असेल.
आरक्षणासाठी लढायचे नाही का? मंत्री भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल
AIPMA च्या Arvind Mehta Technology & Entrepreneurship Centre (AMTEC) मार्फत तरुण पिढीला प्रशिक्षण, प्रोटोटायपिंग, टूल डिझाइन व नवोन्मेषात प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातील प्लास्टिक उद्योग आता केवळ उत्पादनापुरता मर्यादित न राहता गुणवत्ता, नवोन्मेष व जागतिक विश्वासाचे प्रतीक बनत असल्याचे AIPMA पदाधिकाऱ्यांनी सांगितले. योग्य शासकीय समर्थन व उद्योजक वृत्तीमुळे भारत “प्लास्टिकचा विश्वगुरू” होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.