अशोक चव्हाण म्हणाले, पक्षांतर्गत गोष्टी बाहेर बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना भेटून बोलाव्या…
मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मंत्री करायला नको होतं. त्यांनी कुणाकडं तरी पक्षाचं नेतृत्व द्यायला हवं होतं, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केलं. दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाल्याचं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, त्यांनी पक्षांतर्गत गोष्टी आहेत त्या घरात बोलल्या पाहिजेत. उद्धव ठाकरे आज मोठ्या मनोधैर्यानं सर्व सांभाळत आहेत. अशा पद्धतीनं जाहीरपणे बोलण्यानं नुकसान होतं असंही त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की पक्षांतर्गत गोष्टी असतील त्या बाहेर बोलण्यापेक्षा त्यांनी वैयक्तिक जाऊन बोललं पाहिजे.
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, मला असं वाटतं की त्यांना घरचा आहेर असं म्हणता येणार नाही. पण पक्षांतर्गत गोष्टी आहेत त्या घरात बोलल्या पाहिजेत. उद्धव ठाकरे एवढा मोठा उंचीचा माणूस आहे, काम करत असताना पक्षाच्या गोष्टी घरात बोलायला हव्या.
Latur News : लातुरात खळबळ.. काँग्रेस नेत्याच्या घरात भावाने संपविले जीवन; पोलीस घटनास्थळी
म्हणजे एकीकडं फार मोठ्या मनानं जे काही आज राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्याला उद्धव ठाकरे मोठ्या धैर्यानं सर्व सांभाळत आहेत, उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे असोत. याच्यासाठी मोठं मनोधैर्य लागतं. पक्ष सोडून पळ काढणं सोपं काम असतं पण तशा अवस्थेतही पक्ष सांभाळणं आणि त्याची पूनर्बांधणी करणं फार मोठी बाब आहे.
मला असं वाटतं की पक्षांतर्गत गोष्टी असतील त्या बाहेर बोलण्यापेक्षा त्यांनी वैयक्तिक जाऊन बोललं पाहिजे. उद्धव ठाकरेंकडं ज्यांना आपले विचार व्यक्त करायचे असतील त्यांनी बोलायला काही हरकत नाही. परंतु जाहीरपणे माध्यमात अशा प्रकारच्या बोलण्यामुळं पक्षाचं नुकसान होतं, ते आपण टाळायला पाहिजे होतं.