Babanrao Shinde सत्ताधारी बाकावर; थेट फडणवीसांच्या मागे

  • Written By: Published:
Babanrao Shinde सत्ताधारी बाकावर; थेट फडणवीसांच्या मागे

विधिमंडळ अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा चालू आहे. वेगवेगळ्या मुद्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असताना आज विधिमंडळात एक नवीन चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माढाचे आमदार बबनदादा शिंदे आज थेट सत्ताधारी बाकावर दिसले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात उत्तरे देत होते, त्यावेळी अचानक बबनदादा त्यांच्या मागच्या बाकावर येऊन बसलेले दिसले.

विधिमंडळात सर्व सदस्यांच्या बसायच्या जागा ठरलेल्या असतात. प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा आणि वरिष्ठता या पातळयांवर त्या जागा ठरवल्या जातात. यात अनेक सदस्य कामकाजानुसार जागा बदलत असतात. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जागा ठरलेल्या असतात. सभागृहात अध्यक्षांच्या उजव्या हाताला सत्ताधारी आणि डाव्या हाताला विरोधी पक्षाचे सदस्य बसलेले असतात.

Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…

विधिमंडळ सदस्यांनी आपली जागा बदलली तरी ते आपली बाजू बदलत नाहीत पण आज बबनदादा शिंदे हे सभागृहाचे जेष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहाच्या प्रथा माहित आहेत. पण तरीही ते थेट सत्ताधारी बाकावर येऊन बसल्यामुळे सभागृहात चर्चा रंगल्या. त्यात गेल्या काही दिवसापासून बबनदादा भाजपात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बबनदादा सत्ताधारी बाकावर आम्हाला कधी घेणार? असंच विचारत नसतील ना अशीही चर्चा रंगेल.

बबनदादा शिंदे हे सोलापूर जिल्हातील माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. १९९५ पासून सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहे. सोलापूर जिल्हात साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव त्यांना ओळखलं जात. बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे देखील करमाळा मतदार संघातून आमदार आहेत. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून बबनदादा शिंदे यांची ओळख आहे पण मागील काही दिवसापासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिंदे परिवारातील पुढची पिढी भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असून ते लवकरच भाजपात जातील की फक्त पुढची पिढी भाजपात जाऊन बबनदादा मागे राष्ट्रवादी मध्ये राहतील, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.

Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube