संजय राऊतांचा दावा फोल; राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चीट

संजय राऊतांचा दावा फोल; राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चीट

 MLA Rahul Kul get CleanCheet : आताच्या घडीची  सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना भीमापाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात क्लीन चीट  मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर राज्य सरकारने कुल यांना क्लीन चीट  दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार

भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहिले होते. तसेच या संबंधीचे कागदपत्र ईडीकडे पाठवल्याचे देखील राऊत यांनी सांगितले होते. मात्र, या प्रकरणांमध्ये आता राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चीट दिली आहे.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

राज्य सरकारने काय म्हटलं आहे?

साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झालेला नाही. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये. मात्र 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं उत्तर राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाला देण्यात आलं आहे. तर इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube