अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनादरम्यान लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, कार्यकर्त्यांनी विसर्जन रोखले

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan: भिंगारमध्ये गणेश मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप.

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan: अहिल्यानगर: शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गुलाल उधळण्यावरून पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग, हायकोर्टात याचिका फेटाळली, आता उर्वरित भूसंपादनावर प्रशासनाचा भर

या घटनेनंतर भिंगार परिसरात संतापाची लाट उसळली. उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या कारवाईमुळेच लाठीचार्ज झाला, असा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पोलिस बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे दीपक वागसकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची परिस्थिती अधिकृत तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

दिल्लीच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

घटनेनंतर गणेश विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबवण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी भिंगार वेशीजवळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. अनेक गणेश मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती रस्त्यावरच थांबवून ठेवल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी रात्री दोन वाजेपर्यंत भिंगारमध्ये रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगणार ‘देवघर ऑन रेंट’चं ‘अगं आई गं’

मागण्या मान्य होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्यासह गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. भिंगारमध्ये मोठ्या संख्येने गणेश मंडळे विसर्जनासाठी निघाली असताना अचानक निर्माण झालेल्या या तणावामुळे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावर गणपतीच्या मूर्ती थांबवून कार्यकर्त्यांचा ठिय्या आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त, अशी परिस्थिती रात्री उशिरापर्यंत कायम होती.

follow us