Sana Khan Murder Case : धक्कादायक! भाजपच्या सना खान यांना पतीनेच संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झाला विवाह

Sana Khan Murder Case : धक्कादायक! भाजपच्या सना खान यांना पतीनेच संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झाला विवाह

Sana Khan Murder Case : 2 ऑगस्टपासून बेपत्ता असणाऱ्या भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. तसेच सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तर तपासा दरम्यान आरोपी अमित शाहू आणि सना यांचा चार महिन्यापूर्वी मॅरेज पद्धतीने विवाह झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या पतीनेच केली आहे. तशी त्याने कबुली देखील दिली आहे. ( BJP Activist Sana Khan Murder Case Husband killed her after 4 month of marriage )

IND vs WI; टीम इंडियाला वेस्ट इंडिजशी बरोबरी करण्याची संधी; चौथ्या टी-२० सामन्याचा आज अमेरिकेत थरार

काय आहे संपूर्ण प्रकरण

भाजपच्या नेत्या सना खान या 2 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे त्यांचा तपास सुरू होता. त्यात पोलिसांच्या तपासामध्ये शुक्रवारी सना खान यांची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. तर सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तर तपासा दरम्यान आरोपी अमित शाहू आणि सना यांचा चार महिन्यापूर्वी कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह झाला असल्याचं समोर आलं आहे.

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाजी’ कोण मारणार, सनी पाजी की खिलाडी? जाणून घ्या कलेक्शन

2 ऑगस्ट रोजी सना खान नागपुरातून जबलपूरला अमितला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना यांना त्याला 50 लाख रुपये द्यायचे होते. मात्र, 2 ऑगस्टपासून सना खान यांचा फोन बंद होता. सना खान यांचा फोन बंद असल्याने त्यांच्या आईला संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ मानकापूर पोलिसांत सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर अमित शाहू आपलं हॉटेल बंद करुन नोकरासह बेपत्ता झाल्याचं समजताच पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नौकर जितेंद्र गौडला ताब्यात घेतलं.

जितेंद्र गौडने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त लागलेलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यांनतर ती कार स्वच्छ केल्याचंही सांगितलं. तर सना खान यांची आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये हत्या झाल्याचं समोर आलं. दरम्यान, अटकेनंतर अमित शाहूने सना खान यांची हत्या करुन मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली पोलिसांकडे दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की…
नागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासात अमित साहूला अटक करत अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. भाजप कार्यकर्ता सना खाना ही 2 ऑगस्ट पासून बेपत्ता होती. ती जबलपूर वरून बेपत्ता झाली होती. यात सना खान ही जबलपूरला गेली असताना तिचे मित्रा सोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अमित साहूने सना खानच्या डोक्यावर वार करून खून केला आणि त्यानंतर मृतदेह हिरन नदीत फेकून दिला, अशी प्राथमिक माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube