मुंबई महापौर पदासाठी तडजोड करु नका; दिल्ली नेतृत्वाचे भाजप नेत्यांना आदेश
Mumbai Mayor Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Mumbai Mayor Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मात्र भाजपला स्वबळावर बहुमत मिळाला नसल्याने त्यांना महापौर पदासाठी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील महापौर पदाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे मुंबईचे महापौर पद (Mumbai Mayor Politics) आपल्याकडेच घ्या, त्यावर तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घेण्याचे आदेश भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली नेतृत्वाकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) 89 जागा जिंकल्याने महापौर पदावर आपलाच हक्क आहे ही भूमिका मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटासमोर मांडा आणि हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याची देखील दक्षता घ्या असे दिल्ली नेतृत्वाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महापौरपद आपल्याकडे यायला हवे ही मुंबईतील कार्यकर्त्यांची भावना असून त्या भावनेचा सन्मान करायचा आहे. हेच मित्रपक्षाला सांगा त्याचवेळी मुंबई पालिकेतील अन्य पदे आणि अन्य महापालिकांमधील पदांबाबत शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढा असं देखील भाजपच्या दिल्ली नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राशी संबंधिक पदांवर असलेल्या नेत्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची चर्चा झाली असून. इतक्या संघर्षानंतर यश मिळालेले असताना महापौरपद आपल्याकडेच असायला हवे, ही मुंबईतील हजारो कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा असल्याची भावना फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानी घातली आहे आणि त्याला केंद्रीय नेतृत्वानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अफगाणिस्तानने दिला धक्का, पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंंडिजचा दणदणीत पराभव-
तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापौरपदाबाबत उद्धव ठाकरे यांची कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महापौर पदासाठी चर्चा झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापौरपदाबाबत उद्धव ठाकरे यांची कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती आता संजय राऊत यांनी दिल.
