दिवाळीत समृद्धी सुसाट अन् सेफ! वीस दिवसांत सव्वा पाच लाख वाहनांचा सुखरुप प्रवास, भाजपचा दावा
पुणे : अपघात आणि मृत्यू यामुळे कायमच चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) पहिल्यांचा सुसाट आणि सुखरुप प्रवासासाठी चर्चेत आला आहे. दिवाळी निमित्त गेल्या वीस दिवसांत तब्बल सव्वा पाच लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून सुखरूप प्रवास केला आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत भाजपने हा दावा केला आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकौशल्याने आणि दूरदृष्टीमुळे राज्यातील जनतेसाठी समृध्दी महामार्ग हा वरदान ठरत आहे, असेही म्हटले आहे. (BJP has claimed that in 20 days, half five lakh vehicles have traveled safely on the Samriddhi Highway)
काय म्हटले आहे महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तात?
समृद्धी महामार्गावर दररोज जवळपास 11 ते 13 हजार कार धावतात. मात्र, दिवाळीच्या काळात कारची संख्या लक्षणीय वाढली. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दिवसांच्या तुलनेत नोव्हेंबरमधील पहिल्या दिवसांमध्ये सुमारे सव्वालाख कार वाढल्या. 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान 2 लाख 65 हजार 280 गाड्यांनी प्रवास केला. तर चालू महिन्यात याच काळात तब्बल 3 लाख 82 हजार 416 गाड्यांनी समृद्धी महामार्गाचा पर्याय निवडला.
गाड्यांची संख्या दिवाळीआधी कशी वाढत गेली?
महामार्गावर कारची संख्या वाढण्यास 4 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.
शनिवार, 4 नोव्हेंबर – 16 हजार
रविवारी, 5 नोव्हेंबर – 15 हजार 412
बुधवार, 8 नोव्हेंबर – 14 हजार
गुरुवार 9 नोव्हेंबर – 16 हजार 904 कार,
शुक्रवार, 10 नोव्हेंबर – 19 हजार 935 कार या मार्गावर धावल्या.
महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग "समृद्धी महामार्ग"
विमानसेवा व रेल्वेपेक्षा प्रवाशांची समृध्दी महामार्गला पसंती.@Dev_Fadnavis जी यांच्या कार्यकौशल्याने व दूरदृष्टीमुळे राज्यातील जनतेसाठी समृध्दी महामार्ग वरदान ठरत आहे.
दिवाळी निमित्त गेल्या वीस दिवसांत तब्बल सव्वा पाच लाख… pic.twitter.com/y9RtsH6fTH
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 25, 2023
गाड्यांची संख्या दिवाळीनंतर कशी वाढत गेली?
परतीच्या प्रवासात म्हणजे 19 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा संख्या वाढत गेली.
सोमवार, 13 नोव्हेंबर – 21 हजार 354 कार
मंगळवार 14 नोव्हेंबर – 22 हजार 892 कार
बुधवारी, 15 नोव्हेंबर – 20 हजार 932 कार
गुरुवारी, 16 नोव्हेंबर – 24 हजार 90 कार
शुक्रवारी, 17 नोव्हेंबर – 23 हजार 898 कार
शनिवारी, 18 नोव्हेंबर – 23 हजार 340 कार
रविवारी, 19 नोव्हेंबर – 28 हजार 482 कार
सोमवारी, 20 नोव्हेंबर – 20 हजार कार
मंगळवार, 21 नोव्हेंबर 18 हजार 80 कार
समृद्धी आणि अपघात :
गत महिन्यापर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण 1 हजार 281 अपघात झाले. यामध्ये तब्बल 123 प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर जखमींची संख्या हजाराच्या घरात आहे. यात टायर फुटून आणि डुलकी लागल्याने, रोड हिप्नॉटिजममुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने अभियान राबवत महामार्गावरील अपघात स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यात आल्या.
परिवहन विभागाने वाहनचालकांना गाडीत नायट्रोजन हवा भरण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी हवा भरण्याची तसेच वाहनांची तपासणी करण्याचे सेंटर उभारले. जुन्या वाहनांना प्रवेश देखील नाकारण्यात आला. महामार्गावरून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसची तसेच इतर वाहनांची फिटनेस चाचणी करण्यावर भर दिला. या सगळ्यानुळे आता महामार्ग सेफ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कारच्या संख्येमुळे प्रवाशांचा आणि प्रशासनाचा विश्वास उंचावल्याचे मानले जात आहे.