बावनकुळेंनी डिवचले! म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच..

बावनकुळेंनी डिवचले! म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच..

Chandrashekhar Bawankule on Supreme Court Verdict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. तसेच जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं, असं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

याच मुद्द्यावर आता भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचायला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी आज धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Maharashtra Political Crisis : शिंदेंचे सरकार वाचले! ना अजितदादांची गरज ना ‘प्लॅन बी’ची आवश्यकता

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे जे नवीन सरकार सत्तेवर आले ते पूर्णपणे कायदेशीर आहे. सरकार संवैधानिक पद्धतीने आले आहे. ज्यावेळी एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो त्यावेळी ते पद रिकामे ठेवता येत नाही. म्हणून बहुमताने शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांना कायम ठेवले. तसेच कोर्टाने हे मान्य केले की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार आले व हे कायदेशीर आहे. यानंतर आता राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (दि.11 मे) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे. आमदार अपात्र ठरविण्यात आले असते भाजपने प्लॅन बी चा वापर केला असता. अजित पवार यांच्या मदतीने पुन्हा सरकार स्थापन केले असते. तसेच शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले असते तर भाजपचा मुख्यमंत्री होणार अशाही अटकळी बांधल्या जात होता. मात्र, या सगळ्या चर्चा या निकालाने व्यर्थ ठरवल्या.

Maharashtra Political Crisis : आम्हाला अजूनही विश्वास, न्यायालायाच्या निकालावर नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube