Video : भाजपसोबत येताच धनुभाऊ अन् पंकजांचे सूर जुळले; औक्षण करत दिल्या शुभेच्छा!

Video : भाजपसोबत येताच धनुभाऊ अन् पंकजांचे सूर जुळले; औक्षण करत दिल्या शुभेच्छा!

Dhananjay Munde Meet Pankaja Munde :  राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणाले की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

 

दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पंकजा मुंडे नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढेच नाही तर पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांची राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशी भेट झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. पण या भेटीनंतर पंकजा नाराज नसल्याचे दिसून येत आहे.

2009 साली धनंजय मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून धनंजय मुंडे यांनी भाजप पक्ष सोडला होता. तेव्हा भाजपचे दिवंगत नेते व धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे हयात होते. त्यावेळी काका-पुतण्यामध्ये जोरदार संघर्ष झाला होता.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, 2014 साली धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात जाऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा धनंजय मुंडेंचा पराभव झाला होता. यानंतर 2019 साली धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. त्यानंतर सातत्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी साडे बारा वाजता पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहे.  यावेळी त्या काय बोलणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube