Budget Session : महिला आमदाराच्या हातात तान्ह बाळ अन् डोळ्यात पाणी…
मुंबई : हिवाळी अधिवेशनात आपल्या बाळाला घेऊन आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार सरोज अहिरे यांची चर्चा सुरु आहे.
हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत सरोज यांनी सुविधायुक्त कक्षाची मागणी केलीय. सुविधायुक्त कक्ष न मिळाल्याचं अधिवेशन सोडून जाणार असल्याचं आमदार सरोज अहिर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
Italy येथील स्थलांतरित जहाजाच्या दुर्घटनेत 30 हून अधिक मृत्यू तर 40 जणांचे वाचले प्राण
यासंदर्भात दुख: व्यक्त करताना आमदार सरोज अहिर भावूक झाल्याचं पाहायला मिळाल्या आहेत. कक्षाच्या दुरावस्थेबात त्यांनी अध्यक्षांना पत्रही लिहिलंय.अहिर पत्रात म्हंटल्या, सर्व शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करावा असे शासनाचे आदेश आहेत. शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.
कलिंगड गोड आहे का नाही? या पद्धतीने ओळखा
मात्र, विधान भवन मुंबईमध्ये असा कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही, पण हिवाळी अधिवेशन २०२२ मध्ये नागपूर विधान भवनात हिरकणी कक्ष होता. त्याप्रमाणे मुंबईतही महिला सदस्यांकरता बालसंगोपनासाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.
अहिर म्हणाल्या, माझ्या मुलाल ताप आला आहे, तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्याला घेऊन मला विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी मी आजारी मुलालाही सोबत घेऊन आले आहे.
‘आम्ही संघर्ष केला आणि पुढेही करू, पण त्यासाठी तुमची साथ हवी; राज ठाकरेंचं आवाहन
हिवाळी अधिवेशनात जशी हिरकणी कक्षाची व्यवस्था केली होती अगदी तशीच व्यवस्था मुंबईतील विधानभवनात का नाही. मला देण्यात आलेल्या एका रुममध्ये धूळीचं साम्राज्य आहे, कुठलीही सुविधा नाही, सूडाचं राजकारण सोडून तुम्ही जनतेची कामं करण्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, राज्यातलं हे सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही. मी आत्ता अधिवेशनात जात नाहीये. उद्या जर व्यवस्था झाली नाही तर मी उद्या नाशिकला निघून जाईन, या शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलंय.