तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, जयंत पाटील बरसले

तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, जयंत पाटील बरसले

मुंबई : तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकावर केला आहे. नूकतचं अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर जयंत पाटलांनी आपलं मत अधिवेशनात व्यक्त केलं.

दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार

जयंत पाटील म्हणाले, आमचं सरकार आलं आणि विघ्न टळलं, अशी जाहिरात राज्य सरकाकडून करण्यात येत आहे. मात्र, तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रवरचं विघ्न दिसलं, अशी टीका त्यांनी यावेळी केलीय. तसेच मागील आठ महिन्यात महाराष्ट्र गतीमान ऐवजी मागे राहिला असल्याचंही त्यांनी म्हटंलय. निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान या सत्ताधारी सरकारच्या जाहिरातीवर त्यांनी निशाणा साधला आहे.

तसेच आमच सरकार असताना विकासवाढीचा दर 9.1 टक्के होता, आता 6 . 8 टक्के आहे. हे सरकार कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांचं सरकार नसून बिल्डरांचं आहे. गुंतवणुकीवरुनही जयंत पाटलांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सुरतला गेले नसते तर महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या पुढे गेला असता असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Railway Train : महिलेच्या अंगावर टीटीने केली लघवी! प्लेननंतर रेल्वेतही धक्कादायक प्रकार!

सत्ताधारी सरकारची कोणत्याही क्षेत्रात सरकारची चांगली कामगिरी दिसत नाही. मागील नऊ महिन्यांत दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करण्याचं प्रमाण कमी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, राज्य सरकारच्या विकासासंदर्भातील आकडेवारीवरुन हे राज्य सरकारचं अपयश दिसून येत असून तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube