प्रवचनाच्या नावाखाली चर्चमध्ये धर्म परिवर्तन ? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात गुन्हा दाखल
Maharashtra Freedom of Religion : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Freedom of Religion : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवचनाच्या नावाखाली चर्चमध्ये धर्म परिवर्तन केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आल्यानंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यात ब्रिटिश नागरिक असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रिटिश नागरिक गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) राहत असून त्याच्याकडून प्रवचनाच्या नावाखाली गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये धर्म परिवर्तन करण्यात येत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. परदेशी दौऱ्यावर असताना नियमानुसार कुठलाही धर्मप्रचार प्रवचन करता येत नसल्याने नागरिक पुण्यातल्या चर्चमध्ये प्रवचन आणि भजन करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर खडक पोलिसांकडून या प्रकरणात बीएनएसएस 173 नुसार आणि महाराष्ट्र धर्म अधिनियमानुसार (Maharashtra Freedom of Religion Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा
बळजबरीने, फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर जुलै 2026 च्या शेवटी राज्यात अधिकृतपणे हा कायदा लागू करण्यात आला आहे. सामान्य बेकायदेशीर धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 1 लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद देखील या कायद्यात करण्यात आली आहे.