पिक्चर अभी बाकी है! अखेर राऊतांकडून कॅसिनोतील पहिला व्हिडिओ पोस्ट

  • Written By: Published:
पिक्चर अभी बाकी है! अखेर राऊतांकडून कॅसिनोतील पहिला व्हिडिओ पोस्ट

Sanjay Raut Post Macau Casino Video On Social Media Platform X : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मकाऊतील कॅसिनोतला फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणावर स्वतः बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतर आता राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतला व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालताना दिसून येत असून, पिक्चर अभी बाकी है असे कॅप्शन राऊतांकडून देण्यात आले आहे.

 

आपल्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडिओ

कॅसिनोतील फोटो पोस्ट केल्यानंतर राऊतांनी आपल्याकडे कॅसिनोतील बावनकुळेंचे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आज (दि. 24) पाच व्हिडिओपैकी पहिला व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात संपूर्ण पिक्चर दाखवण्यात आलेला नसून, पिक्चर अभी बाकी है असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित व्हिडिओंमध्ये नेमकं काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Supriya Sule : ‘शरद पवारांना अंधारात ठेऊन शपथ घेता मग कारवाई’.. सुळेंचा अजित पवार गटाला फटकारलं

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एका कॅसिनोतील काही भाग दिसून येत आहे.  एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत जात असून, संबंधित ठिकाणी अनेक लोक टेबल खुर्चीवर बसलेले नजरेस पडत आहेत. व्हिडिओ शुटिंग करत असलेली व्यक्ती कोण? हे ठिकाण नेमके कुठले याबाबत राऊतांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यात राऊतांकडून या पोस्टला ‘पिक्चर अभी बाकी है’ असं कॅप्शन दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कपिल शर्माचा एका उच्चभ्रू महिलेला रात्रभर फोन? पतीलाही शिवीगाळ केल्याचा पीडितेचा दावा…

बावनकुळेंसाठी फडणवीस मैदानात

संजय राऊतांकडून मकाऊच्या कॅसिनोतील बावनकुळेंचा फोटो पोस्ट केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरत बावनकुळेंची पाठराखण केली. यात त्यांनी राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केल्याचे म्हटले. फोटो पोस्ट करण्यावरून राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं, असेही फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना स्पष्ट केले आहे.

इमेज खराब करण्याचा प्रयत्न असेल तर लखलाभ

आम्ही काम करुन इमेज तयार केलीयं, खराब प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला लखलाभ, शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना सुनावलं आहे.  34 वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ, असल्याचं म्हणत बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube