पचनी पडण्यावरुन उद्धव ठाकरे-चंद्रशेखर बावनकुळेंची जुंपली…

पचनी पडण्यावरुन उद्धव ठाकरे-चंद्रशेखर बावनकुळेंची जुंपली…

उद्धव ठाकरेचं कोणाला पचनी पडले नाहीत, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

व्यायाम योगा करा, वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर..; ओमराजेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार, खासदार त्यांना सोडून गेले आहेत. अशा व्यक्तीकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व आहे. ज्या नेत्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही ते दुसऱ्यांच नेतृत्व कसं करणार? असा खोचल सवालही बावनकुळेंना यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी त्यावर भाष्य केलं आहे. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे अधिकार आहे. कार्यकर्त्यांचा नेत्यावर आणि नेत्याचा कार्यकर्त्यांवर अधिकार असतोच, त्यामुळे शरद पवार सर्वांच्या हिताचाच ते निर्णय घेणार असल्याचं संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते.

Gautami Patil नाचत असतानाच तरुणांकडून…. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटलं

तसेच शरद पवारांच्या निर्णयाबद्दल मी त्यांना कसकाय सल्ला देऊ शकतो कारण मी दिलेला सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु, असं मिश्किलपणे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. त्यावर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेच कोणाच्या पचनी पडले नसल्याचा टोला लगावलाय.

तसेच उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हटले होते. या त्यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

AI आता तुमचे मनही वाचेल, मनातले विचारही लिहील, Texas मधील संशोधकांनी बनवले तंत्र

आमच्यासोबत होते तेव्हा मोदीजींची तुम्ही किती स्तुती केलीय त्याचे व्हिडिओ आहेत. उद्धव ठाकरे बेईमानीने मुख्यमंत्री झाले होते. आता लोकशाही मार्गाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.

Prithviraj Chavan : काँग्रेससोबतच्या ‘त्या’ वादावादीने शरद पवारांची पहाटेच्या शपथविधीला सहमती

उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणेजी यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही म्हणतात.

तुमच्या विरोधात बोललं म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणं याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचं घर तोडणं याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदीजींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube