पालकमंत्रीपदावर तोडगा कधी निघणार? बावनकुळेंनी थेट तारीखच सांगितली

पालकमंत्रीपदावर तोडगा कधी निघणार? बावनकुळेंनी थेट तारीखच सांगितली

Chandrashekhar Bawankule Statement On Gaurdian Minister : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. तर मंत्रिमंडळ विस्तार होवून महिना लोटलाय. तरी देखील पालकमंत्रिपदाचा (Gaurdian Minister Post) प्रश्न मात्र अजून कायम आहे. पालकमंत्रिपद केव्हा जाहीर होणार? याची उत्सुकता सर्वांना लागलीय. तर महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

पंधरा तारखेपर्यंत पालकमंत्रिपदावर तोडगा निघेल, अशी माहिती भाजप (BJP) नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्याचसोबत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Politics) भाजप, महायुती सज्ज असल्याचं देखील बावनकुळेंनी सांगितलंय. तर महाविकास आघाडी स्वार्थासाठी एकत्र आहे, अशी टीका देखील त्यांनी केलीय.

वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा ‘बळ’; हिरवा कंदील दाखवत राज्य सरकारचे पहिले पाऊल

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्षाने सुरू केली आहे. आमचा पक्ष हा कधीही निवडणुकीला सज्ज असतो. उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी वेगळी तयारी करायची गरज भासत नाही. शिर्डीत प्रतिनिधी सभा झालीय. आम्ही त्या दृष्टीने सुरूवात केलीय. जेव्हा केव्हा निवडणुका लागतील तेव्हा महायुती आणि आम्ही महाराष्ट्रात क्रमांक एकवर असणार आहोत, त्याकरता योग्य पद्धतीने दिशादर्शक काम आम्ही चालु केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.

यासाठी दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी गठित करतोय, ही मोहीम आहे. पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला महाराष्ट्रात दीड कोटी सदस्यसंख्या असलेला पक्ष दिसेल, लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील. तालुकाध्यक्षाच्या निवडी होतील आणि पूर्ण प्रक्रिया पार पडेल, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

ज्येष्ठ अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन; ८७ वर्षी मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर मात्र हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही, नियोजन नाही. तसेच मविआकडे कोणतंही धोरण नाही, केवळ आमचा विरोध करण्याकरता ते एकत्र आले होते, अशी टीका त्यांनी केलीय. तर पंधरा-सोळा तारखेपर्यंत पालकमंत्रिपदावर काहीतरी मार्ग निघेन. सर्वच एकत्र आलो आहोत. बऱ्यापैकी चर्चा झाली आहे. त्यामुळे पंधरा-सोळा तारखेपर्यंत मार्ग निघेन, असं बावनकुळेंनी सांगितलंय.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube