मोठी राजकीय घडमोड! ”बावनकुळे होणार CM? स्वतः फडणवीस शिफारस करणार”

Sanjay Raut एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. पण...

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 07 11T110444.558

Chandrashekhar Bawankule to be Maharashtra CM? Sanjay Raut’s BIG claim : एकीकडे राज्यात ऑपरेश टायगर सुरू असतानाच राज्यात पुन्हा एक मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे भाकित करण्यात आलं आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, असा मोठा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यानंतर अनेक चर्चांना तोंड फुटलं आहे. मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाहीयोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे, असं राऊतांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वतः फडणवीस करतील शिफारस

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातीलदेखील काही नावांची चर्चा असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात मंत्री म्हणून गेलेच तर, राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, एवढेच नाही तर, बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन असल्याचेही राऊत यांनी नमूद केलं.

गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब

एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत यांनी ठासून सांगितलं. तसेच गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. पण, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांचा विचार आणि शिफार, स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील. जो राज्य योग्य दिशेने पुढ घेऊन जाईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.

follow us