सरकार ‘AC’ रुमध्ये निवांत बसलय! काय ते लवकर ठरवा; अन्यथा.. जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजे आक्रमक
छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यानंतर सरकारवर गंभीर आरोप केले.

Chhatrapati Sambhaji Raje met Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणिसाठी गेली सहा दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची सध्याची तब्येत पाहून अत्यंत वेदना होत आहेत. परंतु, सरकार सध्या मोठ्या एसी रुमध्ये बसलेलं आहे. तसंच, विरोधी पक्षही काही बोलायला तयार नाहीत असा थेट घणाघात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. ते अंतरवाली सराटी येथे आले असता माध्यमांशी बोलत होते. (Manoj Jarange) यावेळी त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामध्ये निर्णय घ्यावा, कुणी अडवलय असा प्रश्ही उपस्थित केला.
Sharad Pawar : महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?, शरद पवारांनी काय दिलं उत्तर
सध्या परिस्थिती कठीण आहे. जरांगे यांनी सलाईन घेण बंद केलं आहे. जर काही बर वाईट झालं तर याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल असही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार प्रहार केलाय. ते म्हणाले वर्षभरापूर्वी सर्वजण येथे येऊन गेले. परंतु, आता कुणी फिरकत नाही. का तुम्हाला मराठा समाज, बहुजन समाज नकोसा झाला का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. मी जरांगे यांची भेट घेतली. त्यांची तब्येत खालावली आहे. मी जरांगे पाटील यांच्या पाठिशी आहे.