मुख्यमंत्री शिंदेचा अयोध्या दौरा ठरला, ‘या’ तारखेला जाणार अयोध्येला

  • Written By: Published:
मुख्यमंत्री शिंदेचा अयोध्या दौरा ठरला, ‘या’ तारखेला जाणार अयोध्येला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आली आहे.  येत्या ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत तर त्यावेळी ते शरयू नदीवर आरती देखील करणार आहेत.

काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटायला अयोध्याचे महंत आले होते. त्यांनी शिंदे यांना अयोध्या येण्यासाठी आमंत्रण दिले. यावर आपणही लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

…तरच भाजपचा पराभव, भाजपला हरवण्याचं गणित प्रशांत किशोर यांनी सांगितलं…

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या आमचा प्रेरणा स्थान आहे. अयोध्या हा श्रध्देचा विषय आहे, आम्ही नक्कीच अयोध्याला जाऊ. तिथे येऊन आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. अयोध्याचे महंत यांच्या शब्दाला आम्ही नक्कीच मान देऊ आणि आम्ही अयोध्याला जाऊ असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेचा दुसरा उत्तर प्रदेश दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यापासूनचा हा त्यांचा दुसरा उत्तरप्रदेश दौरा असणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आग्रा किल्ल्यावर गेले होते. त्यानंतर ते पुन्हा अयोध्येच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहे.

याआधीही एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते, त्याहीवेळी त्यांनी आपल्या सोबतचे सर्व आमदार-खासदार सोबत नेले होते.

Raj Thackeray जनतेच्या मनातील भावी ‘मुख्यमंत्री’; मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube