Video : फडणवीसांनी खरचं पडळकरांचे कान टोचले का?; प्रतिक्रिया ऐकून तुम्हीच ठरवा…
जेव्हा जेव्हा पडळकरांनी वादग्रस्त विधानं केली आहेत तेव्हा तेव्हा राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची नोंद आहे.

शरद पवारांचे निष्ठावान नेते जयंत पाटील यांच्या भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी गलिच्छ शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्वांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर खरचं त्यांनी पडळकरांचे कान टोचले का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटलांना काय म्हणाले होते पडळकर?
जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
पडळकरांना मोठा नेता होण्याची संधी
एकीकडे पडळकरांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापलेले असाताना फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना पडळकर हे तरूण नेते आहेत. अनेकदा ते बोलताना आपल्या अॅग्रेशनचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले की, आपण अॅग्रेशन लक्षात घेऊनच बोलले पाहिजे असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांची प्रतिक्रिया इथपर्यंत ठिक होती. पण, पुढे याच विषयावर बोलताना ते म्हणाले की, पडळकरांना भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघत असतील याचा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना दिल्याचे फडणवीस म्हणाले.
टीका केली की मोठा होण्याची संंधी?
पडळकरांनी अशा प्रकारे विधान करण्याची आणि वादाचा प्रसंग निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. जेव्हा जेव्हा पडळकरांनी वादग्रस्त विधानं केली आहेत तेव्हा तेव्हा राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची नोंद आहे. पण, सुधरतील ते पडळकर कसले असे कालच्या विधानावरून म्हणण्याची वेळ आता आल्याचे दिसून आली आहे. पडळकर यांच्या यापूर्वीच्या विधानांवरून पक्षालाही अनेकवेळा अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. पण, राज्याचा प्रमुख आणि भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून फडणवीसांनी पडळकरांना कठोर शब्दांत तंबी देणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीने ते बोलले देखील पण, पुढे त्यांनी पडळकरांना भविष्यात मोठा नेता होण्याची संधी असल्याचे बोलून गेले. त्यामुळे एखाद्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केल्यानंतर नेत्यांना भाजपात मोठा नेता होण्याची संधी मिळते का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
🕑 1.12pm | 19-9-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/8NAXYqViKc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2025