भिकारी अवलाद, जयंत पाटील काहीतरी गडबड …, आमदार पडळकरांची पुन्हा जीभ घसरली

Gopichand Padalkar On Jayant Patil : राज्याच्या राजकारणात नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर

  • Written By: Published:
Gopichand Padalkar On Jayant Patil

Gopichand Padalkar On Jayant Patil : राज्याच्या राजकारणात नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने आता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत टीका केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून आज आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर (Jayant Patil) टीका करताना पडळकर म्हणाले की, माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची (Gopichand Padalkar) नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून अशी टीका आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली. तसेच यावेळी बोलताना पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका करत जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,अशा शब्दात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? : रोहित पवार

तर दुसरीकडे या टीकेला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले की, ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका अत्यंत अश्लाघ्य आणि संतापजनक आहे. या माणसाला बोलताना कधीही कुठलंही तारतम्य नसतं आणि भाजपाच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालण्याचं काम करणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध केला जातो का, हे आता पहावं लागेल. निषेध नाही केला तर त्यांना भाजपाचीच फूस असल्याच्या आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्ही मात्र त्यांच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी संघाला जपानमध्ये ‘नो एन्ट्री’, विमानतळावर दाखल होताच हकलून दिले; नेमकं घडलं काय?

 

follow us