डॉक्टरेटनंतर शिंदेना पत्रकारितेची पदवी; कुणाची बातमी छापणार!

डॉक्टरेटनंतर शिंदेना पत्रकारितेची पदवी; कुणाची बातमी छापणार!

Ekanath Shinde :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाने डी लिट पडवी दिल्यानंतर शिंदे चांगलेच ट्रोल झाले होते. अनेक राजकिय पक्षाच्या नेत्यांनी आरोप प्रत्यरोप केले. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात डॉक्टर कंपाउंडर याविषयीचा वाद चांगलाच रंगला होता. ही चर्चा संपत नाही तोच मुख्यमंत्री यांनी आणखी एक पदविका अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. केवळ अभ्यासक्रम पुर्ण केला नाही तर तब्बल ७७% टक्के गुण मिळवून डिस्टिंगशन मध्ये पास झाले.

एकनाथ शिंदे यांनी पत्रकारिता डिप्लोमा पुर्ण केला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या वृत्तपत्र विभागाचा हा डिप्लोमा आहे. कोरोना काळात म्हणजे २०२१ मध्ये एकनाथ शिंदे यांनी या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला होता. तो पूर्णही केला . हा डिप्लोमा पुर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र बहाल करणे बाकी होते.

ठाकरेंच्या राजीनाम्यावरील पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित अखेर खरं ठरलं!

आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत कुमार पाटिल यांनी एकनाथ शिंदे यांना हे पदविका प्रमाणपत्र बहाल केले. मुख्यमंत्ती एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हे प्रमाणपत्र देण्यात आले.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यकर्मात मुख्यमंत्री यांनी याबाबत पुसटशी कल्पना दिली होती.

संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

मी देखील तुमच्यासारखा पत्रकार झालो आहे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितले होते .डी लिट, आर्ट मध्ये बीए आणि आता पत्रकार पदविका अभ्यासक्रम मध्ये मुख्यमंत्री यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. मुख्यमंत्री पुढे कुठल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान, आज सत्तासंघर्षाचा निकालाने मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube