Doctor Protest : आज राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Doctor Protest : आज राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन

मुंबई : राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयामधील (Government Hospital) समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (Community Health Officer )आज 1 फेब्रुवारीला एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिलीय. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer Strike) आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील 10 हजार समुदाय आरोग्य अधिकारी या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं आज दिवसभर ग्रामीण भागामधील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणारंय.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अनेकदा प्रशासनाला निवदनं दिलेत. त्यासोबतच यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. तरीही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याचं पाहून, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आज एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिलीय.

आज 1 फेब्रुवारीला राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यामुळं आता याबद्दल प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहावं लागणारंय.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागणी!
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट “ब” दर्जा देण्यात यावा.
– सन 2017 पासून आमच्या हक्काचे 5% वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावे.
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट “ब” दर्जा देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत, निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन रू.25000/- (62.5%) वरून रू.36000/- (90%) व कामावर आधारित वेतन रू.15000 (37.5%) वरून रु.4000 (10%) एवढे करावे
– समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निश्चित करण्यात यावे.
– सध्याचे 23 इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदला चे फॉरमॅट रद्द करून केंद्राने सुचविल्याप्रमाणे 15 इंडिकेटर अमलात आणावे आणि तोपर्यंत प्रति इंडिकेटर एक हजार रुपये देण्यात यावे
– केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदोन्नती बढती मिळावे.
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना TA-DA मिळावे
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे
– हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावे आणि तो कामावर आधारित नाही तर सरसकट द्यावा.
– एस फॉर्म भरण्याची तांत्रिक जबाबदारी हे समूदाय आरोग्य अधिकारी यांचे नसून सुद्धा आमच्यावर सक्ती करत आहे. त्यामुळे मा. संचालक- 02 यांनी काढलेले पत्र त्वरित रद्द करावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube