Tukaram Mundhe : दोन शिफ्ट, सुट्टी रद्द अन् वाढीव वेळ काम…मुंढेंच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच लिहिला!

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत 29 कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ यांना पत्र लिहिलंय.

Tukaram Mundhe's warning: 'Disha curriculum' must be mandatory, otherwise special school grants will be stopped!

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांना मोठा धक्का बसला असून मुंढे यांच्याविरोधात तब्बल 29 अधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा लिहित थेट मंत्री नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवलंय. या कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.

मुंढे यांच्याविरोधात पत्र लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे. कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची नियमित वेळ बदलून दोन शिफ्टमध्ये काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यसभेत ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण; अवमान केल्यास फौजदारी गुन्हा, तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

यासोबतच शनिवारची सुट्टी असो किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील कर्मचार्यांना कामावर हजर राहण्याचा आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनात 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या असून या आक्षेपाची लेखी नोंद केली आहे.

कर्मचाऱ्यांचे आक्षेप काय?
-प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरु करण्याचा निर्णय
-निर्णयासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा, संसाधने उपलब्ध नाहीत
-कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण
-सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत वाढीव वेळ काम करुन घेतल्याचा आरोप
-शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश
– अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी घाई
– दरमहा ठरावीक मर्यादेपर्यंतच नमुन्यांचे अचूक विश्लेषण होऊ शकते. मात्र, त्यापेक्षा अधिक नमुने तपासण्याचा दबाव

दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करुन दोन शिफ्टची कार्यपद्धती तत्काळ रद्द करावी, यासोबतच सुट्ट्यांचा लाभ आणि रिक्त पदे भरुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

follow us