Ashok Chavan : विखे माझे मित्र आहेत की शत्रू ? ; ‘त्या’ ऑफरवर अशोक चव्हाण संतापले..
Ashok Chavan : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपात (BJP) येण्याची ऑफर दिली होती. यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकारणात सगळेच माझे मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत. पण त्यांनी दिलेली ऑफर मला मान्य नाही. विखे पाटील यांनी दिलेली ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले.
मंत्री विखे यांनी जे वक्तव्य केले. यामागे त्यांचा काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का, अशी शंका उपस्थित होत असल्याचे चव्हाण म्हणाले.
हे वाचा : BJP : मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर; म्हणाले, काँग्रेससाठी..
सध्या अशोक चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आहे. नाशिकमध्ये जी निवडणूक झाली ती व्यक्तिगत अजेंड्यावर झाली तिथे पक्षाचा विचार कुठे झाला, पक्षाचा विचार करण्यासाठी पक्षात वेळ कुणाला आहे, असा सवाल विखे यांनी केला.अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरही काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही स्वीकारले आहे.त्यांच्या नेतृत्वात काम करणे सगळ्यांनाच आवडेल तेव्हा अशोक चव्हाण यांनीही याचा विचार करावा, असे विखे यांनी याआधी म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावर आता मंत्री विखे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.