देश दु:खात अन् भाजप नेते सोहळे करताहेत, लाज कशी वाटत नाही?, कॉंग्रेसची टीका

Congress on Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) केलेल्या 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानं देशात दुखवटा पाळला जात आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरलाय आणि लोकांमध्ये तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, हे अत्यंत संताप आणणारे कृत्यू असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप (BJP) नेत्यांना लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी (Atul Londhe) केला.
2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
हीच भाजपची संस्कृती आहे का?
लोंढे म्हणाले की, 26 तारखेला अमरावतीमध्ये भाजप नेत्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यांच्या चितेची राख अजून विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही शोकाकुल वातावरण आहे; ते अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पण भाजप नेते मात्र हार-तुरे घेते आहेत, हीच भाजपची संस्कृती आहे का? असा सवाल लोंढेंनी केला.
कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेचे नियम बदलले; जाणून द्या सर्वकाही
राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत. या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजप नेत्याना काहीच देणंघेणं नाही, असंही लोंढे म्हणाले.
गृहमंत्री राजीनामा देणार का?
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसने आता थेट केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतानाही सुरक्षेत अशी चूक का झाली? लष्कर आणि सीमा हे थेट मोदी सरकारच्या अखत्यारीत येतात, तरीही दहशतवादी सीमावर्ती भागात आत कसे घुसले? इन्टेलिजन्सने एवढी मोठी चूक कशी केली? 26 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का? या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेणार का?, असे सवाल कॉंग्रेसने केले.