Rupali Chakankar : धक्कादायक! राज्यात मुली सुरक्षित नाहीत, दररोज 70 मुली होतात बेपत्ता

Rupali Chakana Kr

daily 70 Girls missing in Maharashtra : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीतील आहे.

ही माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत दिली. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रातून जानेवारी महिन्यात 1600 मुली गायब झाल्या. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली गायब झाल्या. तर एप्रिल महिन्यात 1810 मुली गायब झाल्या. तर मुली गायब होण्यात 2020 पासून राज्याचा पहिला क्रमांक झाला आहे. यावर राज्यातील यंत्रणांचा वापर होताना दिसत नाहीय. तर महिला आयोगाच्या वतीने गेल्या 16 महिन्यांपासून याचा पाठपुरावा सुरू आहे.’

हरवलेला व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. दरम्यान गेल्या महिन्यात राज्य महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्राम घेतला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या गृहमंत्र्यांचीही उपस्थित होते. तर प्रत्येत नेत्याचा देखील एक मिसींग सेल आहे. यावर गृह विभागाला आम्ही अहवालही पाठवला आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली. त्यामुळे या मुली गायब होण्यातून होणारे गुन्हे याला आळ घालण्यासाठी गृह विभागाने ताताडीने पावलं उचलावी असं ही चाकणकर म्हणाल्या.

ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट आहे.

Tags

follow us