‘त्यांनी जमिनीत तोंड काळं केलं’; फडणवीसांचा जळगावमधून खडसेंवर निशाणा

‘त्यांनी जमिनीत तोंड काळं केलं’; फडणवीसांचा जळगावमधून खडसेंवर निशाणा

Devendra Fadanvis On Eknath Khadase :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहे. जळगाव येथे शासन आपल्या दारी हा सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याअगोदर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रावदी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसेंनी आता मालक बदलल्याचे फडणवीसांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे म्हटले. यावर फडणवीसांना विचारले असता त्यांनी खडसेंना जोरदार टोला हाणला. फडणवीस म्हणाले की, काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खडसेंना आता नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे जावे लागले नसते.

‘अशीच नौटंकी करत राहिलात तर तेलंगणा सुद्धा’… राऊतांचा पंढरपुरात आलेल्या ‘KCR’ना इशारा

त्यामुळे अशा काळ्या झेंडाना घाबरणारे लोक आम्ही नाही. असे किती जरी काळे झेंडे दाखवले तरी घाबरणार नाही. आम्ही जनतेचे लोक आहोत. जनतेसाठी काम करतोय. जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही इथे आहोत. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.

भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. ही सर्व मंडळी आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आली आहे. मोदींच्या सरकारमध्ये या सर्वांवर कारवाई होत असून त्यांचा भ्रष्टाचार समोर येत आहे. मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तरी यांच्यावर कारवाई होत राहील, म्हणून हे एकत्र आलेत, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube