ब्रेकिंग न्यूज! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; पोलीस सतर्क

  • Written By: Published:
Eknath Shinde Mpsc

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत.

112 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यावरून त्या व्यक्तीने “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं बोलून हा कॉल कट केला. त्यानंतर अचानकपणे पोलिसांनी सक्रिय होत थेट तपास सुरु केला. पोलिसांनी पटकन शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलं आहे.

कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सादर व्यक्तीने दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी शोध सुरू केला असता पुण्यातील वारजे इथलं हे कॉल लोकेशन असल्याचं उघड झालं. कॉल करणारा धारावीत राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags

follow us