ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ करणार; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadanvis on Maharashtra Police Conference : ड्रग्जच्या प्रकरणात एखादा पोलीस कर्मचारी तो कोणत्याही रॅंकचा असो तो या प्रकरणात थेट संबंधित आढळल्यास त्याला सस्पेंड न करता थेट त्यावर बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ते महाराष्ट्र पोलीस परिषद या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलपूर्वीच मोठा धक्का, स्टार सलामीवीर जखमी
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये विशेषत: तीन नव्या फौजदारी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा आणि सादरीकरण झालं. त्यानंतर राज्याने सायबर गुन्हे रोखण्या करता तयार केलेल्या रोबस्ट महासायबर प्लॅटफॉर्मचं सादरीकरण झालं.
Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंचा फैसला आता 5 मार्चला
महिला आणि बालकांवरील अत्याचाराचे गुन्हे उघड करून त्यावर तात्काळ आरोपपत्र दाखल करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर ड्रग्जबाबत कोणती कारवाई सुरू आहे. पुढे त्यात काय बदल करायचे यावर चर्चा झाली. त्याबाबत झिरो टॉलरन्सची पॉलिसी असणार आहे. त्यामुळे एखादा पोलीस कर्मचारी तो कोणत्याही रॅंकचा असो तो या प्रकरणात थेट संबंधित आढळल्यास त्यावर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल.
जगातील महाग चलन कोणतं?, डॉलरपेक्षा कितीपट आहे किंमत?; वाचा डॉलर कितव्या स्थानावर?
त्याचबरोबर नव्या कायद्यांनुसार आता गुन्ह्यांमध्ये आढळून आलेली जप्त केलेली लोकांची संपत्ती त्यांना परत देण्याच्या तरतुदी आम्ही केल्या आहेत. त्यामुळे आता पुढच्या सहा महिन्यात पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजे. लोकांनाी त्यांचा मुद्देमाल परत गेले पाहिजे स्पष्ट आदेश आम्ही या बैठकीत दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ते महाराष्ट्र पोलीस परिषद या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.