वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलपूर्वीच मोठा धक्का, स्टार सलामीवीर जखमी

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलपूर्वीच मोठा धक्का, स्टार सलामीवीर जखमी

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलपुर्वीच ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शाॅट (Matthew Short) जखमी झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायलनमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारत (India) किंवा न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. मात्र या सामन्यापुर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) ग्रुप सामना पावसामुळे रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायलनमध्ये ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना अफगाणिस्तानसोबत होता मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी एक- एक गुण देण्यात आले. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट फलंदाजी करताना जखमी झाला. अफगाणिस्तान संघाविरुद्ध मॅथ्यू शॉर्टने 15 चेंडूत 20 धावांची खेळी केली. मॅथ्यू शॉर्टच्या दुखापतीबद्दल स्वतः कर्णधार स्टीव्ह स्मिथने सांगितले. यामुळे आता मॅथ्यू शॉर्ट पायाच्या दुखापतीमुळे सेमीफायनल सामन्यातून बाहेर पडू शकतो.

हा खेळाडू घेणार प्लेइंग 11 मध्ये मॅथ्यू शॉर्टची जागा ?

ऑस्ट्रेलियाचा संघ आता सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या मॅथ्यू शॉर्टच्या जागी प्लेइंग 11 मध्ये कोणाला स्थान देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, मॅथ्यू शॉर्टच्या जागी सलामीवी फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

स्वप्नील जोशीचा गुजराती चित्रपट शुभचिंतक ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह – कूपर कॉनोली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube