वसुली थांबवली की, गुंतवणूक येते; मविआवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर वन

वसुली थांबवली की, गुंतवणूक येते; मविआवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर वन

Devendra Fadnavis On FDI : परदेशातील उद्योगांद्वारे राज्यात येणाऱ्या गुंतवणूक म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये राज्याने हा टप्पा गाठला आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस आणि भाजपवर प्रचंड टीका देखील झाली होती.
( Devendra Fadnavis Critisizes MVA on FDI )

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांच्या दिल्लीतील खलबतांनंतर बच्चू कडूंचं थेट विधान; म्हणाले, अभी नहीं तो कभी नहीं

याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली. फडणवीसांनी या ट्विटमध्ये म्हटले की, ‘होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर 1 !आम्ही सातत्याने सांगत होतो की, खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे आणि आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 होणार.’

त्याचबरोबर पुढे तेअसं देखील म्हणाले की, ‘डीआयपीपीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल जारी केला, त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.’

शिरसाटांनी सांगितला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त; ‘या’ तारखेच्या आत होणार मंत्री

तसेच त्यांनी या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जोडला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या गेल्या काही दिवसांपुर्वीच्या भाषणाचा भाग आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘महाराष्ट्र उद्योगात पहिल्या नंबरवर होता आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणू’ यावेळी त्यांनी महाविकास आघाजी र देखील निशाणा साधला ते म्हणाले, वसुलीची प्रवृत्ती आपण थांबवली तर आपोआप राज्यात गुंतवणूक येत असते आणि ती आता येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube