अर्थसंकल्प सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होणार पुर्ण

अर्थसंकल्प सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होणार पुर्ण

मुंबई : (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी)
राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पाहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू नेते आहे. विशेषता अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यावरची मांडणी ते ज्यापद्धतीने करतात ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असायची. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देखील खाजगी संस्थेमार्फत राज्याची आर्थिक परिस्थिती समजावून सांगणे. पुस्तिका काढणे, अर्थसंकल्प कसा छापावा याचे पत्रकारांना मार्गदर्शन कारणे. अर्थसंकल्प बाबत भाजप आमदारांना समजावून सांगणे ही सर्व जबाबदारी विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस करत असत. त्यात फडणवीस यांचा वाटा अधिक होता. एव्हाना एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांचे मुद्दे आणि बॅक ऑफिसची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असायची.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना या सर्व कार्यक्रमांना अधिकचं धार आली होती. २०१३ मध्ये तर फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण नेता म्हणून संपूर्ण फोकस स्वतःकडे ठेवला होता. यादाकदाचित २०१४ मध्ये भाजपा सरकार सत्तेत आले तर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे अर्थमंत्री रहातील यात कुठलीही शंका कोणीही बाळगली नाही. सर्वजण अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहात होते.

राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आले. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी देखील ते गृहमंत्री आणि अर्थमंत्री होतील अशीच अनेकांना अपेक्षा होती. पण त्यांनी नगरविकास आणि गृहखाते स्वतःकडे ठेवले. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री झाले. तब्बल पाच वर्ष सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.

२०१९ मध्ये सरकार पुन्हा येईल अस वाटतं असतना राजकारणात मोठा ट्विस्ट आला. शिवसेना युती तुटली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले. अडीच वर्षानंतर राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला आणि सत्तातंर झाले. फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. पण अनपेक्षित पणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. यावेळी नगरविकास विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठेवला. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभाग ठेवला त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे गृह आणि अर्थ खाते स्वतःकडे ठेवले.

२०१४ पुर्वी अर्थमंत्री म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहिले जायचे ते आता खऱ्या अर्थाने अर्थमंत्री झाले आहे. आता ते आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले. अर्थसंकल्पची तयारी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या आमदारांची बैठक घेतली. त्याचबरोबर या प्रस्तावित योजनावर अधिकारी यांच्या बैठका घेतल्या आहे. दोन महिने ते या अर्थसंकल्पावर काम करत आहेत.

समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान; अजित पवारांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर फडणवीस यांनी ताशेरे ओढले. जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भावर अन्याय करणारा अर्थसंकल्प , जनतेच्या हाती भोपाळा अशा स्वरूपाच्या टीका केल्या. अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन दिग्गज आता विरोधात आहेत. अजित पवार तर स्वतः विरोधी पक्ष नेते आहेत. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्याकडून अधिक जागरुकतेने अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी आहे.

तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल

गेले दोन वर्ष भाजप आमदारांना निधी मिळाला नाही. त्यानतर शिंदे सरकार काळात स्वतःचे सरकार असताना निधी नाही ही भाजप आमदारांची ओरड, राज्यात शेतकऱ्यांची अवस्था , आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा निवडणुका पाहता या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. त्यात हा अर्थसंकल्प फडणवीस यांचा पाहिला अर्थसंकल्प असणार आहे. तो कसा असेल याचीच चर्चा अधिक राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube