IAS Transfer : केंद्राच्या दट्ट्यानंतर थेट आयएएसच जिल्हाधिकारीपदावर!
राज्यात ४१९ आयएएस पद आहेत. यातील फक्त ३२८ आयएएस अधिकाऱ्यांना थेट पोस्टिंग मिळाली आहे. यातही जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या पदावर प्रमोटी अधिकारी यांची नियुक्ती केली जात होती. गेल्या १० वर्षात महाराष्ट्रात काही निवडकच जिल्ह्यात थेट आयएएस अधिकारी नेमले गेले आहेत. याबाबत थेट केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली होती.
Khalistan News: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने थेट अमित शहा आणि एस जयशंकर यांना दिली धमकी
राज्य सरकारला दरवर्षी २० आयएएस अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. पण केंद्र सरकारकडून केवळ सहा ते आठ अधिकारी दिले जातात. यावेळी राज्य सरकारने मागणी केली आम्हाला आयएएस अधिकारी द्या, केंद्राने पत्र पाठवलं त्यानंतर तत्काळ किती आयएएस अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिली. तेव्हापासून हा विषय चांगलाच चिघळला होता. आता ६६ टक्के आयएएस तर ३३ टक्क्यांवर प्रमोटी अधिकारी हे की पोस्टवर दिले जातील, असं स्पष्ट होत आहे.
थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…
आयएसएस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या :
राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुंबई जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे – लातूर जिल्हाधिकारी
संजय चव्हाण – मुद्रांक अतिरिक्त नियंत्रक, मुंबई
आयुष प्रसाद – जिल्हाधिकारी. जळगाव
भुवनेश्वरी एस. – जिल्हाधिकारी, वाशिम
अजित कुंभार – जिल्हाधिकारी, अकोला
डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचल – जिल्हाधिकारी, पांचल
डॉ. पंकज अशिया – जिल्हाधिकारी, यवतमाळ
कुमार आशिर्वाद – जिल्हाधिकारी, सोलापूर
अभिनव गोयल – जिल्हाधिकारी, धुळे
सौरभ कटीयार – जिल्हाधिकारी, अमरावती
तृप्ती धोडमिसे – जिल्हा परिषद सीईओ, सांगली
श्री. अंकित – जिल्हा परिषद सीईओ, जळगाव
शुभम गुप्ता – जिल्हा परिषद सीईओ, धुळे
मिनल कर्नवाल – जिल्हा परिषद सीईओ, नांदेड
डॉ. मैनक घोष – जिल्हा परिषद सीईओ, यवतमाळ
मनिषा आव्हाळे – जिल्हा परिषद सीईओ, सोलापूर
सावन कुमार – जिल्हा परिषद सीईओ, नंदुरबार
अनमोल सागर – जिल्हा परिषद सीईओ, लातूर
आयुषी सिंह – जिल्हा परिषद सीईओ, गडचिरोली
वैष्णवी बी. – जिल्हा परिषद सीईओ, अकोला
पवनीत कौर – संचालक जीएसडीए, पुणे
गंगाथरण डी. – बृहन्मुंबई महानगरपालिका सहआयुक्त.
अमोल जगन्नाथ येडगे – एमएससीईआरटी, पुणे
शन्मूगर्जन एस – अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई
विजय चंद्रकांत राठोड – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एसआयडीसी मुंबई
निमा अरोरा – संचालक आयटी, मुंबई
वैभव दासू वाघमारे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी
संतोष सी. पाटील – जिल्हा परिषद सीईओ, कोल्हापुर
आर.के.गावडे – जिल्हाधिकारी, परभणी
अंचल गोयल – अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर
संजय खंडारे – प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय
तुकाराम मुंढे – सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग मंत्रालय
जलाज शर्मा – जिल्हाधिकारी, नाशिक
ए. एन. करंजकर – महापालिका आयुक्त, नाशिक
आर. एस. चव्हाण – जिल्हा परिषद सीईओ, पुणे
पृथ्वीराज बी.पी. – सीईओ, स्मार्ट सिटी नागपूर
रुचेश जयवंशी – सीईओ, एनआरएलएम मुंबई
मिलिंद शंभरकर – सीईओ, महात्मा फुले जनआरोग्य, मुंबई
मकरंद देशमुख – सचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय
बी. एन. बस्टेवाद – जिल्हा परिषद सीईओ, रायगड
दरम्यान, या बदल्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. मुंढेंची एकाच महिन्यात बदली झाली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाच्या सचिवपदाची तुकाराम मुंढे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.