जमत नसेल तर राजीनामा द्या, मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करू नका, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

जमत नसेल तर राजीनामा द्या, मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करू नका, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

Vijay Wadettiwar : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला . त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्याचा काम राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोप या पत्रकार परिषदेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच सत्ताधारांनी विधिमंडळ बंद पडल्याची आज भूमिका घेतली होती असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ज्यावेळी ओबीसी आणि मराठा समाजाचा आरक्षणावरून वाद होता त्यावेळी सरकारने आमच्यासोबत चर्चा केली होती त्यानंतर राज्यात आरक्षणावरून आंदोलन सुरु झाला मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात घेतला नाही आणि सरकारने त्यांना काय आश्वासन दिले याबाबत विरोधकांना सरकारने काहीच सांगितले नाही. आंदोलकांना लेखी स्वरूपात काय दिलं ते देखील विरोधकांना सांगितले नाही असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असं सांगितले होते मात्र आतापर्यंत आरक्षण मिळाला नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे. मात्र तरीही देखील सरकार कोणतीही भूमिका घेत नाही. सरकार दोन्ही समाजांना मुद्दाम झुलवत ठेवलं आहे असा हल्लाबोल आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

याचबरोबर हाके यांचं उपोषण स्थगित करायला गेलेले सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तिथे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे ते तिथे वाद मिटवायला गेले होते की वाढवायला गेले होते का? तसेच भुजबळांना कोणाविरुद्ध तलवार काढायची होती? असा सवाल देखील त्यांनी वेळी उपस्थित केला.

जेव्हा विरोधकांची गरज होती तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं नाही मात्र आता त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी रोखल नसतानाही ते आता आम्हाला बोलवत आहेत मात्र आम्ही  तुम्ही जे काही आश्वासन दिले आहे ते अधिवेशनात मांडा अशी भूमिका घेतली आहे असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

याच बरोबर जर सरकारला आरक्षणावर निर्णय घेता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा आमच्याकडे सत्ता द्यावी आम्ही काही मार्ग काढू मात्र सरकारने आमच्याकडे बोट दाखवून अपयश लपवू नये. असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज