Eknath Shinde : छोटी आव्हानं मी स्वीकारतच नाही… असे म्हणत आदित्य ठाकरेंवर केला पलटवार!

Eknath Shinde : छोटी आव्हानं मी स्वीकारतच नाही… असे म्हणत आदित्य ठाकरेंवर केला पलटवार!

मुंबई : काही लोक सकाळी उठले की गद्दार, खोके एवढे दोनच शब्द बोलतात. तिसरा शब्दच त्यांना माहिती नाही. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. पण मी अशी छोटी-मोठी आव्हान स्वीकारत नाही. मोठी-मोठी आव्हाने स्वाकारतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर (Aditya Thakre) लटवार करत ते काम सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं आणि पूर्ण केला आहे. या राज्यात जनतेला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) आणि नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) फोटो लावून मतदान मागितलं होतं. शिवसेना-भाजपा (Shivsena-BJP) मतदारांनी शिवसेना-भाजपा युती म्हणून मतदान केले होते ना. मात्र, तुमच्या मनामध्ये वेगळेच काही तरी होतं म्हणून तुम्ही अडीच वर्षे वेगळा घरोबा केला, अशी उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होते म्हणूनच २०१९ ला जे व्हायला पाहिजे होते. त्याची दुरुस्ती आम्ही अडीच वर्षांनंतर केली. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं.

वरळी येथे कोळी बांधवांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मला वरळीतून येऊन दाखवा असे चँलेंज दिले होते. हा एकनाथ शिंदे पहिला एकटाच आला आणि हेलिकॉप्टरमधून न जाता थेट रस्त्यावरून गेला. शाखाप्रमुखापासून बाळासाहेबांचे विचार आणि आम्ही प्रेरित होऊन प्रभावीत होऊन शिवसैनिक झालो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पठडीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणालाही न घाबरता आम्ही काम करत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोळी बांधव-भगिनींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. जे-जे काही करावे लागेल ते-ते नक्की या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही, ते आम्ही बोलणार नाही. काही लोक तर काय-काय बोलत असतात. निवडणुका आल्या की मुंबई केंद्र शासित होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार, मग मुंबईकरांचे काय होणार, हे सगळे जावई शोध प्रत्येक निवडणुकीत लावतात. परंतु, मी तुम्हाला सांगतो की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईची, महाराष्ट्राची एक इंच ही जागा कुणाला घेता येणार नाही, घेऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. जे जायला पाहिजे होते, जे घालवायला पाहिजे होते, ते आम्ही सहा महिन्यांपूर्वी घालून टाकलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube