अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा; राहुरीत एमआयडीसी उभारून युवकांना रोजगाराचे आश्वासन

पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला.

  • Written By: Published:
Untitled Design (25)

Employment assurance for youth : राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला. गुहा, तांभेरे, तांदूळनेर, माळेवाडी, डुकरेवाडी, सात्रळ, सोनगाव, अनापवाडी, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव आदी गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. दौऱ्यादरम्यान गावांतील प्रश्न व शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांनी थेट मोबाईलवरून संबंधित अधिकारी तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रश्न मांडले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेने फोन करणारे नेते होते. संघर्षातून उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट जोडले गेले होते. त्यांच्या जनता दरबारातून अनेक प्रश्न मार्गी लागले. आजही अडचण आली की त्यांच्या आठवणी जाग्या होतात. गोरगरिबांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अक्षय कर्डिले यांच्या गावभेट दौऱ्यात महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. “ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माझा कुणीही शत्रू किंवा विरोधक नाही. ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी आहे. राहुरी तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुरी विद्यापीठाच्या जागेत एमआयडीसी उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. गावोगावी फिरताना ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. “मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मला आवाज द्या, स्वतःच्या गावासारखे काम करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. आमदार झाल्यानंतर पदाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल. कोणतेही गाव वंचित राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. “माझ्या वडिलांनी जनतेसाठी संघर्ष केला, प्रत्येक माणूस जोडला आणि मतदारसंघात कुटुंबासारखे नाते निर्माण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जनतेच्या सेवेत सदैव हजर राहीन, असे त्यांनी सांगितले.यावेळी रामचंद्र कोळसे, साईनाथ कोळसे, बाळासाहेब दिनकर, राजेंद्र मुसमाडे, विलास मुसमाडे, उत्तम मुसमाडे, काशिनाथ साबळे, रमेश साबळे, लक्ष्मण साबळे, ह.भ.प. गणपत सरोदे, ह.भ.प. जनार्दन नाईकवाडे, अमोल भनगडे, भास्कर गाडे, धनंजय गाडे, विनीत ताठे, अतुल ताठे, वसंत डुकरे, कारभारी ताठे, कैलास डुकरे, तुलसीराम डुकरे, बाळकृष्ण चोरमले, जयवंत जोरवरेकर, रमेश पणाले, सतीश ताठे, योगेश गीते बाबासाहेब शिंदे जया आत्रे राजेंद्र आढाव सुभाष दिघे बाळासाहेब दिघे अप्पासाहेब दिघे पांडुरंग दिघे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us