सरकारमधला प्रत्येकजण गृहमंत्री असल्यासारखा वागतो; शशिकांत शिंदे आक्रमक

सरकारमधला प्रत्येकजण गृहमंत्री असल्यासारखा वागतो; शशिकांत शिंदे आक्रमक

मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विधानपरिषदेमध्येही (Legislative Councils)विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदेंनी (Shashikant shinde)विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात नेण्यापासून तर थेट राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही बोट ठेवले. आज सर्रास ठिकाणी सरकार बदलल्यानंतर गृह खातं कोणाकडे आहे? त्याच्यापेक्षा सरकारमधला प्रत्येक घटक आता मीच गृहमंत्री (Home Minister)असल्यासारखा वागत असल्याची टीका केली आहे.

सरकारमधला प्रत्येकजण गृहमंत्री असल्यासारखा वागतो; शशिकांत शिंदे आक्रमक

यावेळी शिंदे म्हणाले की, पोलीस यंत्रणेवर आपले किती नियंत्रण आहे याच्याबद्दल ते म्हणाले की, पूर्वी कोणाचंही सरकार असलं तरी प्रशासनाला मुक्तहस्तपणे काम करण्याची संधी दिली जात होती. पोलिसांवर अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकण्याचे फार क्वचित प्रसंग दिसत होते.

आज सर्रास या ठिकाणी सरकार बदलल्यानंतर गृह खातं कोणाकडे आहे? त्याच्यापेक्षा सरकारमधला प्रत्येक घटक आता मीच गृहमंत्री आहे, अशा पद्धतीने वागतो हे सांगण्याची वेळ येतेय, हे दुर्दैव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अशी पद्धत पाहिल्यानंतर अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे त्यांनाही योग्य निर्णय घेता येत नाही. मुंबईमध्ये पोलीस आयुक्तांना पर्यायी पोलीस आयुक्तपद तयार केलं जातं, याचा अर्थ सरकारचा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही.

प्रविण दरेकर आणि निरंजण डावखरेंनी काल सांगितलेल्या घटनेवर सरकारकडे चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारकडून आज-उद्या आज उद्या करत आज शेवटचा दिवस आहे. तरी त्याच्यावर आपण काहीही चर्चा झाली नाही, असेही सांगितले.

विरोधकांवर हल्ले होतात हे समजू शकतो पण सत्तारुढ पक्षाच्या मित्र पक्षांच्या नेत्यांवरही हल्ले होतात, त्यावरुनही आमदार शिंदेंनी जोरदार टीका केली. काही काळात याचा आपल्याला दुष्परिणाम दिसेल येईल असंही त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube