शेतकरीही बोगस माल पकडू शकतो, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
सर्वसामान्य शेतकरी देखील बोगस खते, माल, बियाणे पकडू शकतो, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. दरम्यान, अकोल जिल्ह्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या धाडीसत्रावर विरोधकांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे.
Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’
पुढे बोलताना ते म्हणाले, धाडीसंदर्भात मी पोलिसांनाही कल्पना दिली होती. त्यानूसार धाडी टाकल्या आहेत. बोगस माल, बियाणे, खते सर्वसामान्य शेतकरीसुद्धा पकडू शकतो. त्यानंतर ज्याच्याकडे बोगस बियाणे, खते सापडले आहेत, त्याच्यावर आम्ही कारवाई करु शकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार
मला राज्यातल्या शेतकऱ्यांवर विश्वास आहे. माझ्या शेतकरी बांधवाला जो कोणी फसवण्याचं काम करेल त्याला माफ केलं जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच बोगस बियाण्यांबाबत कडक कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, बोगस मालाची निर्मिती करणाऱ्यास 10 वर्षांची शिक्षा होईल, अशा कायद्याची आगामी अधिवेशनात घोषणा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
अकोल्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीच्या पथकामध्ये सत्तारांचा पीए असल्याचा आरोप करण्यात आला.
मात्र, तो माझा पीए नसल्याचा दावा सत्तारांनी केला मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दौऱ्यात त्याचं पीएचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालंय.त्यामुळे आता अब्दुल सत्तार अडणीत येणार असल्याचं बोललं जातंय.