समृद्धीसाठी 4 एकर शेती देत त्याबदल्यात 20 एकर घेतली

  • Written By: Last Updated:
समृद्धीसाठी 4 एकर शेती देत त्याबदल्यात 20 एकर घेतली

नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आशा काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘रामगिरी’वर खास स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला व आपल्या भावना व्यक्त केल्या.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आता हा रस्त्याचा वापर लोकं करू लागली आहेत. असं असलं तरीही समृद्धी महामार्गाची घोषणा झाली होती त्यावेळी अनेक जिल्ह्यामधून त्याला प्रखर विरोध झाला होता.

मात्र त्या परिस्थितीतही बदलत्या काळाची पावलं ओळखून काही शेतकऱ्यांनी आपली जमीन या महामार्गासाठी देण्याची तयारी दर्शवली. अशा 9 गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी खास आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधून या महामार्गाचा त्यांना नक्की कसा फायदा झाला ते त्यांच्याच तोंडून जाणून घेतले.

यावेळी या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देऊन आमच्या आयुष्यात दुप्पट समृद्धी आली असल्याचे या शेतकऱ्यांनी कबूल केले. तसेच यातील काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी देऊ केलेल्या जमिनीच्या दुप्पट शेती घेऊन आपले उत्पन्न दुप्पट केल्याचे सांगितले. यातील एका शेतकऱ्याने आपण चार एकर शेती समृद्धीसाठी देऊन त्याबदल्यात वीस एकर शेती, घर, गाडी घेतली असल्याचं मुखमंत्र्यांना सांगितले.

तर काहींनी यापूर्वी आम्ही अल्पभूधारक शेतकरी होतो मात्र समृद्धी महामार्गाच्या आलेल्या पैशातून जास्त शेती घेऊन आम्ही सगळे बहुभूधारक शेतकरी झालो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमचं आयुष्य गोड केल्यामुळे आम्हाला त्यांचं तोंड गोड करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या शेतकऱ्यांना गोड पदार्थ भरवून आपले आयुष्य आगामी काळात अधिक समृद्ध व्हावे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. thanked and the for building the

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube