आता टोल फास्टॅगनेच भरा! 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; नवा नियम काय?

FASTag New Rules : राज्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील (FASTag New Rules) सर्व टोलनाक्यांवर पथकर येत्या 1 एप्रिलपासून ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, रोख किंवा अन्य पद्धतीने पथकर भरायचा असेल तर खिशाला भुर्दंड बसणार आहे. या पद्धतीने तुम्हाला पथकर भरायचा असेल तर दुप्पट पैसे द्यावे लागतील.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यांसाठी फास्टॅग प्रणाली लागू केली आहे. रोख पैशांत टोल घेण्याऐवजी एकाच डिजीटल पद्धतीने टोल जमा होईल अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे टोलमधील व्यवहारांत पारदर्शकता राहणार आहे. तसेच टोलनाक्यांवर पैशांची लूट, अपहार होण्याच्या घटनाही कायमच्या बंद होणार आहेत. तसेच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.
सन 2021 पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या टोलनाक्यांवर 100 टक्के टोल वसूली फास्टॅगने करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रात याबाबत सक्ती करण्यात आली नव्हती. वाहनाचालक अनेक ठिकाणी रोख स्वरुपातच पैसे देत होते. यानंतर 7 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत सार्वजनिक खासगी सहभाग धोरणातील उपभोक्ता शुल्काचे दर व संबंधित बाबींविषयक नियमावलीत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे आता टोल टॅक्स फक्त ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चार दिवसांनंतर बदलणार फास्टॅगचे नियम; नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल
FASTag चे नवीन नियम
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 28 जानेवारी 2025 रोजी एक नवीन नियम लागु केला होता. या नियमानुसार, 17 फेब्रुवारी 2025 पासून जर टोल प्लाझावर टॅग रीड करण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला तर किंवा रीड केल्यानंतर किमान 10 मिनिटांसाठी टॅग ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास पैसे दिले जाणार नाही. या नवीन नियमामुळे यूजर्सला त्यांचा FASTag स्थिती दुरुस्त करण्यासाठी 70 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
नवीन नियमांचा थेट यूजर्सवर परिणाम होणार आहे. नवीन नियमांमुळे आता टोल नाक्यावर ब्लॅकलिस्टेड FASTag चा शेवटच्या क्षणी रिचार्ज केल्याने तुमचे नुकसान होणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही टोलवर पोहोचता तेव्हा तुमचा फास्टॅग आधीच ब्लॅकलिस्ट केलेला असेल तर लगेच रिचार्ज केल्याने पैसे मिळणार नाहीत.
मोठी बातमी! उद्यापासून फास्टॅगच्या नियमांमध्ये होणार बदल, आजच पूर्ण करा ही प्रक्रिया नाहीतर