अहिल्यानगरमध्ये कौटुंबिक कलहाची भयावह प्रचिती; मुलाच्या हत्येत भावासह वडिलांचा सहभाग

उघड झालेली माहिती अधिकच धक्कादायक होती. किरणची हत्या त्याच्याच सख्ख्या भावाने केल्याचे समोर आले. योगेश शिवाजी कवाने असे आरोपीचे नाव आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 74

Father and brother involved in son’s murder : अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वांबोरी घाटात पोत्यामध्ये भरलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपस सुरू केला. सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोहें आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत तरुणाची ओळख पटवली.

मृताचे नाव किरण शिवाजी कवाने असे असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील रवीवारी असल्याचे निष्पन्न झाले. तपासदरम्यान उघड झालेली माहिती अधिकच धक्कादायक होती. किरणांची हत्या त्याच्याच सख्ख्या भावाने केल्याचे समोर आले. योगेश शिवाजी कवाने असे आरोपीचे नाव आहे. या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह पोत्यात भरून तो वांबोरी घाटात नेऊन फेकला. या कृत्यात त्याला त्याचे वडील शिवाजी शंकर कवाने यांनी देखील मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राहुरी हादरली!15 वर्षीय मुलीचे अपहरण, पाच दिवस जंगलात अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण याला दारूचे व्यसन होते. तो सुरुच्या नशेत आई-वडिलांना वारंवार मारहाण करत असल्याची माहिती पुढे आली आहे. कुटुंबीयांनी त्याला समाज देण्याचा तसेच व्यसनमुक्तीचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या वर्तनात बदल झाला नव्हता. घटनेच्या दिवशी देखील किरण दारूच्या नशेत घरी येऊन आई-वडिलांसोबत वाद घालत होता. त्यावेळी त्याचा आणि योगेशच्या तीव्र स्वरूपाचा वाद झाला. या वादातूनच रंगाच्या भरात योगेशने किरणचा गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून वांबोरी घाटात टाकण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासात हा संपूर्ण कट उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी योगेश कवाने आणि शिवाजी कवाने यांच्या विरोधात खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबातील वादातून इतका टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

follow us