FDA च्या कारवाया थांबेनाच! 24 छापे, 57 हॉटेल्सला नोटीस, अन् 5 कोटी 22 लाखांचा साठा जप्त…
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने राज्यभरात छापेमारी करुन जवळपास 5 कोटी 22 लाख रुपयांचा साठा जप्त केलायं.
FDA Action : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाईचा (FDA Action ) धडाका सुरु आहे. FDA च्या कारवाईत भेसळयुक्त दूध, खाद्यतेल, अन्नपदार्थांसह हॉटेल्सवर कारवाई करण्यात येत आहे. एफडीएने मुंबई, पालघर, वसई, वाशी, सांगली, अकोला, जळगाव, विक्रोळी, नाशिक, पुणे जिल्ह्यात कारवाई करुन जवळपास 5. कोटी 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल, दूध, अन्नपदार्थ जप्त केले आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे राज्यातील भेसळमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील मरीन लाईन्स भागातील पारशी डेअरी फार्म, गोरेगावच्या कांदिवलीतील दूध विक्रेते कृष्णा लिंगमपल्ली, रवी पाटील, गगोवंडीतील मेसर्स सुफी डेअरी, मुलुंडच्या मेससर्स अग्रवाल एंटरप्रायझेस, पालघर जिल्ह्यातील पारशी डेअरी, वसई येथील शिव डेअरी, वाशीतले मसाला व्यापारी, सांगली येथील बजरंग पाटील, अकोला या परिसरातून अन्न पदार्थ, भेसळयुक्त दूधावर एफडीच्या पथकाने कारवाई केलीयं.
या विशेष कारवाईत एफडीच्या पथकाने एकूण 2,317 लिटर दूध, 30 लिटर भेसळीसाठी वापरण्यात येणारे रिफाइंड खाद्यदतेल, तसेच 6,849 किलो दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून 45 लाख 78 हजार 396 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर अकोला जिल्ह्यात अन्नपदार्थ निर्मिती कारखाना उध्वस्तत करुन सुमारे 1 कोटी 23 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलायं. यासोबतच राज्यातील 57 हॉटेल्स, रेस्टॉरंटला सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने नागरिकांसाठी तक्रार पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांना तक्रार करण्यासाठी Food Drug Grievance Portal सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना अन्नपदार्थ, बनावट व निकृष्ट दर्जाचे औषधे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षेत्रातील इतर बाबींविषयी थेट ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे.
-पारशी डेअरी फार्म प्रा. लि. येथे गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा त्रुटी; अन्न व औषध
प्रशासनाकडून परवाना तात्काळ निलंबित
-गोरेगाव येथे दूधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध
प्रशासनाची कारवाई
-गोवंडी येथील दुग्ध व्यवसायिकाविरुद्ध कारवाई; 1,683 लिटर सैल पाश्चराईज्ड
म्हशीचे दूध नष्ट.
-मुलुंड येथील अन्न आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 61.25 कि.ग्रॅ.
दुग्धजन्य पदार्थ जप्त.
-.पालघर येथे पारशी डेअरी फार्म प्रा. लि. वर अन्न व औषध “शासनाची धडक
कारवाई; सुमारे ₹32.11 लाख किमतीचा अन्नसाठा जप्त
– वसई येथील शिव डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 181 कि.ग्रॅ. पनीर जप्त
-वाशी एपीएमसी येथील मसाला व्यापाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई;
₹11.24 लाखांची हिरवी वेलची जप्त
– सांगली येथे भेसळयुक्त दूध निर्मितीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
– सांगली येथे दूध भेसळ प्रकरणात दुसरी कारवाई, दूध व भेसळीसाठी वापरण्यात येणारा साहित्यसाठा जप्त
– अकोला येथे प्रतिबंधित अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध
प्रशासनाची धडक कारवाई;11.23 कोटींचा साठा जप्त
-. जळगावमध्ये 12.15 लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
– मालाड येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध
प्रशासनाची कारवाई; 1.27 लाखांचा मुद्देमाल जप्त
-विक्रोळी येथे प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीवर अन्न व औषध प्रशासनाची
कारवाई
अन्नपदार्थांवरील कारवाई…
-वडाळा येथील आंबा पल्प प्रक्रिया युनिटची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी
– अमरावती येथील रिसॉर्टवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; मुदतबाह्य शीतपेयांचा
साठा जप्त
– वसई येथील टोडी शॉपवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
-पुणे मार्केटयार्ड येथील मसाला व खाद्यपदार्थ व्यापाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाची
कारवाई; 8.15 लाखांचा साठा जप्त
-घाटकोपर येथे ई-मेल तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यावरील अन्न व्यवसायिकांची
तपासणी; नोंदणी व स्वच्छतेबाबत सूचना