बहिणीला घरात का आणले म्हणत आमदार क्षीरसागरांची वडिलांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

बहिणीला घरात का आणले म्हणत आमदार क्षीरसागरांची वडिलांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

FIR Against NCP Leader Sandeep Kshirsagar :  बीड जिल्ह्याच्या राजकारणाची आपली एक खासियत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेते बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातीलच एक क्षीरसागर कुटूंब होय. आता त्यांच्याच परिवारातील एक बातमी समोर येते आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ही तक्रार त्यांच्या वडीलांनीच पोलिसांकडे दिली आहे. वडिलांना धक्का-बुक्की केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावरुन संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जून क्षीरसागर यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवींद्र क्षीरसागर असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे.

राजकीय वर्तुळाला चिंता मविआची; मात्र, पवार-ठाकरेंमध्ये चर्चा ताडोबाच्या वाघांची

मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली व माझ्यासह बहिणींना घराबाहेर हाकलून दिल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार; वाळूमाफियांचे धाबे दणाणले

यावरुन दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गुरले करत आहेत. संदीप क्षीररसागर व त्यांचे भाऊ या दोघांवर कलम 323, 504, 506, व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र क्षीरसागर यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube