दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गायीच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर मिळणार

  • Written By: Published:
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गायीच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर मिळणार

Radhakrishan Vikhe : महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर देणे आता बंधनकारक असणार आहे. जी दूध डेअरी प्रतिलिटर 34 रुपयेपेक्षा कमी दर देईल त्या डेअरी वरती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Good news for milk farmers! Cow’s milk will fetch Rs 34 per litre)

गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाचा दर निश्चित करण्यासाठी दूध दर निश्चिती समिती स्थापन केली होती. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून गायीचे दूध हे किमान 34 रुपये प्रतिलिटर प्रमाणे खरेदी केले जाईल. तसे आदेश सर्व शाकाहारी आणि खासगी दूध उत्पादक संघांना देण्यात आले आहे. तसा आदेश सरकारने आज काढला आहे. त्याची अमलबजावणी उद्या म्हणजे शनिवार 15 जुलै 2023 पासून केली जाईल. तसेच या दुधाच्या दराची दर तीन महिन्याने पुनरावृत्ती होईल. तशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?

खरेदीदरात वाढ होणार असली तरी विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये सामंजस्य राखण्यासाठी उसासाठी किमान आधारभूत (एफआरपी) किमान हमीभावाचा (एमएसपी) अवलंब करण्यात येतो. त्याच धर्तीवर दूध उत्पादकांना कायमस्वरूपी परवडणारा दर मिळावा यासाठी दूध दर निश्चिती समिती स्थापन केली असल्याचे विखेंनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube