राज्यात मुसळधार पाऊस; 4 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी
Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. तर आता हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक शहरांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज 4 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी होणार असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालनासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पुणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
भारताला धक्का, दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव; इंग्लंडने मारली बाजी-
तर दुसरीकडे पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांनी आणि घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.