अतिवृष्टी म्हणजे एक इव्हेंट : फडणवीस बोलून अडकले

अतिवृष्टी म्हणजे एक इव्हेंट : फडणवीस बोलून अडकले

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज पुणे (Pune)दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यानी विरोधकांवरही जोरदार टीका केली. फडणवीसांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस (Avakali Paus)झाला तात्काळ पंचनाम्याचे आपण आदेश दिले आहेत. आता त्याची सुरुवात झाली आहे. त्याला थोडा काळ तरी लागणार आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) त्याचा फोटो जरी काढला तरी आम्ही त्याला पंचनामा मानतो, त्याचवेळी अतिवृष्टी म्हणजे एक इव्हेंट असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.त्यामुळं आता हे बोलून देवेंद्र फडणवीस अडकले आहेत. त्यावर आता विरोधकाना घेरण्याची शक्यता आहे.

मला विरोधकांचं आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या काळातले पैसे आम्ही देतोय आणि इकडे रात्री पाऊस पडला की सकाळी हंगामा करतात, पंचनामा झाला नाही. एवढ्या वेगानं पांचनामा? रात्री पडलेल्या पावसाचा त्यांनी तरी पाहिलाय का? तेव्हा मला असं वाटतं अतिवृष्टीवगैरे सारखे हे इव्हेंट आहेत, याबाबतीत थोडं संवेदनशील असलं पाहिजे, याचं राजकारण करणं योग्य नाही असंही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शाळेत खोटा इतिहास शिकवला जातोय, शिक्षण पद्धतीवर कालिचरण महाराजांची टीका

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कसब्याच्या पोटनिवडणुकीवरुन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, एखादी निवडणूक हरलो किंवा जिंकल्याने फार काही फरक पडत नाही, मात्र कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्याचा पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केलं असून आम्ही काळजी घेऊ असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्यामुळं आता पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता फडणवीसांनी आम्ही त्याचं पोस्टमार्टम करत असतो असं म्हटलंय. त्यामुळं आता नेमकं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube