विधवा म्हणू नका…..गंगा भागीरथी म्हणा, मंत्र्याच्या पत्राने वाद

  • Written By: Published:
विधवा म्हणू नका…..गंगा भागीरथी म्हणा, मंत्र्याच्या पत्राने वाद

Heramb Kulkarni On Mangal Prabhat Lodha : महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना गंगा भागीरथी अशी नवीन ओळख मिळून देण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे आता राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. राज्याच्या विविध क्षेत्रातील लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यावर प्रतिक्रिया देताना म्हणतात …जर हे पत्र खरे असेल, तर हास्यास्पद आहे. विधवा महिला यांना गंगा भागीरथी म्हणावे का? असे महिला बालकल्याण मंत्री यांचे आजचे पत्र एकाचवेळी हास्यास्पद व चुकीचा दृष्टीकोन असणारे आहे. अपंगांना दिव्यांग म्हणा, दलितांना हरिजन म्हणा हे शब्द बदलून वास्तव बदलते का? शब्द टोचण्यापेक्षा तुम्हाला वास्तव टोचले पाहिजे.

 न्यू आर्टस् कॉलेज पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तविक विधवा शब्द जर त्यातील अपमानकारक सामाजिक वास्तव बदलले तर खटकणार नाही..तो वैवाहिक स्थिती सांगणारा शब्द आहे. जसे घटस्फोटित, परित्यक्ता शब्द आहेत तसा हा शब्द आहे. पण त्या महिलांना इतके अपमानाचे जिणे जगावे लागले की त्या शब्दाची भीती वाटायला लागली व ते वास्तव बदलण्यापेक्षा मग शब्द बदलून समस्या सोपी केली जाते.

गंगा भागीरथी हे तर अधिक हास्यास्पद आहे. म्हणजे पती वारला की महिला नदी इतकी पवित्र होते? आणि पती असताना मग ती कोणती नदी असते? स्त्रियांचे असे सतत वेगवेगळे दैवतीकरण करायचे आणि दुसरीकडे मात्र वास्तव तसेच ठेवायचे …असा हा आपला सामाजिक सरकारी व्यवहार आहे..विधवा याच शब्दात त्या महिलांचे वास्तव नीट समजते तो राहू द्या,त्या महिलेचा सामाजिक अपमान होणार नाही याची काळजी घ्या…मग शब्द बदलण्याची गरज वाटणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube