जूहूतील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन

ISKCON Juhu License Suspended तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने FDAने परवाने निलंबित केले.

ISKCON Juhu License Suspended

ISKCON Juhu License Suspended: मुंबईतील जूहू येथील इस्कॉनच्या (ISKCON) तीन अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. FDA कडून 3 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आलेल्या तपासणीनंतर 7 सप्टेंबर रोजी परवाना निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.

चर्चा तर होणारचं! कर्मचाऱ्यांना 5-10 टक्के अन् पंतप्रधानांना थेट 64 टक्के पगारवाढ….

FDA च्या कारवाईत इस्कॉन, हरे कृश्ना लँड येथील अन्न आस्थापना, इस्कॉन फुड सर्व्हीसेस- रेस्टॉरंट आणि इस्कॉन गोविंदाज रेस्टॉरंट या तीन आस्थापनांचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा, स्वच्छता, कच्च्या मालाची हाताळणी, अन्न साठवणूक, कीटक नियंत्रण, ड्रेनेज व्यवस्था, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि वैद्यकीय तपासणी, अन्नपदार्थांची प्रयोगशाळा तपासणी तसेच आवश्यक नोंदी ठेवण्याबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.

बारामतीत खळबळ! झुंबा क्लासवरील कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच; 5 लाख घेताना हवालदार रंगेहाथ पकडला

इस्कॉन, हरे कृश्ना लँड

इस्कॉन, हरे कृश्ना लँड या आस्थापनेत अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची नियतकालिक तपासणी केल्याचे अभिलेख उपलब्ध नव्हते. तसेच कच्चा आणि तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवला जात नसल्याने एका अन्नपदार्थातून दुसऱ्या अन्नपदार्थात दूषित घटक जाण्याचा धोका निर्माण होत असल्याचे आढळले. कीटकांचा प्रादुर्भाव, स्वच्छतेतील त्रुटी आणि उपकरणांचे नियमित मापन न केल्याचेही निदर्शनास आले.

क्रूड 100 डॉलरजवळ पोहोचताच चिंता वाढली; सामान्य भारतीयांसह जगासाठी याचा अर्थ काय?

इस्कॉन फुड सर्व्हीसेस- रेस्टॉरंट

इस्कॉन फुड सर्व्हीसेस- रेस्टॉरंटच्या तपासणीत किचनचा प्रवेश खुला असल्याने कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता, ड्रेनमध्ये अन्नकचरा साचलेला असून ड्रेन चोक असल्याचे आढळले. काही कर्मचारी एप्रन आणि हातमोजांशिवाय काम करत असल्याचे तसेच त्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे FDA च्या तपासणीत समोर आले.

इस्कॉन गोविंदाज रेस्टॉरंट

तर इस्कॉन गोविंदाज रेस्टॉरंटमध्ये पिण्याच्या पाण्याची मानकांनुसार नियमित तपासणी होत नसल्याचे, कच्च्या मालाची योग्य तपासणी व स्वच्छता केली जात नसल्याचे तसेच ज्याची मुदत आधी संपणार आहे, तो माल आधी न वापरल्याचे आढळले. कोल्ड रुममध्ये पाणी साचलेले, ड्रेन चोक तसेच कीटकांचा प्रादुर्भाव असल्याचेही निदर्शनास आले. फुड हँडलर्सची वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षणाच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

Video : जरांगेंचा उपयोग संपला, आता सरकारला त्यांना मारायचंय; राऊतांचा गंभीर आरोप

“सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र” या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न आस्थापनांची नियमित तपासणी आणि नियामक कारवाई केली जात आहे. व्यापक जनआरोग्याच्या हिताचा विचार करून नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे FDAने स्पष्ट केले आहे. परवाना निलंबित असलेल्या कालावधीत संबंधित आस्थापनांनी अन्नपदार्थांशी संबंधित व्यवसाय करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

follow us